लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0
42

 

लोहारा:- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे जयंती उत्सव समिती व श्रीगिरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व प्रथम राजमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन उबाठा गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या हस्ते करुण रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आले. या शिबीरात रक्ताचे संकलन सह्याद्री ब्लड बैंकेचे डॉ.शशीकांत करंजकर, आलकेश पोहरेगावकर, तेजस कनेरे, अनुजा नाईकवाडी यांनी केले. यावेळी डॉ.हेमंत श्रीगिरे, नगरसेवक प्रशांत काळे, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, पं.स.माजी सदस्य सुधीर घोडके, जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रेम लांडगे, उपाध्यक्ष आकाश विरुदे, रघुविर घोडके, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार गिरीश भगत, पत्रकार गणेश खबोले, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, उमेश देवकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे, सुरेश वाघमोडे, विकास घोडके आंबदास विरुद्धे, अनिल येलोरे, गुरुनाथ लामतुरे अनिकेत फरिदाबादकर, अमोल वाले, अदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here