उमरगा :– शहरातील मुन्शी प्लॉट येथील एका घरात खब-याने दिलेल्या माहिती आधारे गुटख्याची झाडाझडती घेण्याकरीता गेले असता उमरगा पोलीसांना चक्क तेथे एक लाख बेचाळीस हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ असलेला गांजा आढळून आल्याने संबंधित मुद्देमाला सह महिलेस जेरबंद करण्याची कारवाई दि.30 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्यासुमारास करण्यात आले असल्याची माहिती उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्वीनी भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
सविस्तर वृत्त दि.30/05/2025 रोजी दुपारी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले हे अधिकारी व अंमलदार यांचेसह पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीता रवाना होवुन दुपारी 15:30 वा.सु. पेट्रोलिंग करीत उमरगा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारे एकोंडी रोडवर आले असता. गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मुन्शी प्लॉट येथील महिला नामे कमल गोपीनाथ राठोड ही तिच्या राहत्या घरी गुटखा ठेवुन विक्री करीत आहे. अशी माहिती मिळताच त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांना माहिती देवुन त्यांचेकडुन घरझडती वारंट घेवुन दोन शासकीय पंच व पोलीस स्टाफसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर घरात गुटखा नसुन घरातील एका खोलीत निळया रंगांच्या कॅरीबॅगमध्ये उग्रवास येत असलेले अंमली पदार्थ गांजाचे पाकीटे ठेवल्याचे व खोलीतुन उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक धाराशिव, अपर पोलीस अधीक्षक धाराशिव ,उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांना माहिती देवुन त्यांच्या आदेशाने पुढील छापा कारवाई करीता नायब तहसीलदार, फोटोग्राफर वजन काटा धारक, दोन पंच व पोलीस स्टाफसह सदर घरात छापा मारून घरझडती घेतली असता महिला नामे कमल गोपीनाथ राठोड उर्फ कमल चंद्रकांत मदने उर्फ कमल नामदेव किसवे रा. मुन्शीप्लॉट उमरगा ता. उमरगा हिचे कब्जात 1,42,170 रू किमतीचे एकुण 09 किलो 430 ग्रॅम वजनाचे गांजा सदृष्य अंमली पदार्थ मिळुन आल्याने सदर गांजा सदृष्य अंमली पदार्थ पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केले, आरोपी महिले विरूध्द सपोनि पांडुरंग कन्हेरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्याद वरून पो.स्टे. उमरगा गु.र.नं. 345/2025 कलम 8 (क), 20 (ब) (ii) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास स.पो.नि. श्रीकांत भराटे हे करीत आहेत. आरोपी महिलेस सदर गुन्हयात अटक करून मा. प्रथमवर्ग न्यायालय उमरगा यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयांनी नमुद आरोपीस दि.02/06/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.सदरची कामगिरी धाराशिव च्या पोलीस अधीक्षक रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उमरगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोहेकॉ शिवलिंग घोळसगांव, पोहेकों. चैतन्य कोनगुलवार, पोना. अनुरूद्र कावळे, पोना. यासीन सय्यद, पोकों. नवनाथ भोरे, पोकों. योगेश बिराजदार, पोकों. राजेश वादे, महिला पोलीस मपोकॉ. स्वाती कौरव, मपोकों. शांता कंदले यांच्या पथकाने केली आहे.