कन्या प्रशाला नळदुर्ग चा 95 टक्के निकाल, परीक्षेत यशस्वी मुलींचे अभिनंदन व सत्कार

0
73

 

लोहारा ;–  सर्व उत्तीर्ण विद्यार्थींनींचे पुष्पाहार व पेढा भरवून .प्रशालेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांनी केले. गुणानुक्रमे प्रथम कु प्रतिक्षा संतोष मुळे-90.60%, द्वितीय कु मनिषा संजय राठोड-82% तर तृतीय कु.बेग मिर्झामिद्दतजुआ अल्ताफ- 81.20%. या मुलींनी यशाची परंपरा कायम टिकवली यश मिळविले. या घवघवीत यशाचे शालेय व्यवस्थापन समितीकडून व पालकांकडून मुख्याध्यापक व त्यांचा स्टाफ यांचे कौतुक करण्यात आले शाळेचा निकाल 95% लागला.यांना घडविणारे शिक्षक कर्मचारी श्रीम.निर्मला गावित,लिलावती कौरव अश्विनी साळूंखे,हारुण आतार तसेच प्राप मिलींद कुलकर्णी,सत्तेश्वर जाधव,दत्तू सगर यांचे यासाठी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले शाळेत नियमितपणे वेगवेगळे उपक्रम सहल,सांस्कृतिक कार्यक्रम,स्पर्धा परीक्षा,मोफत गणवेश,मोफत साॉक्स-शूज,मोफत पूस्तके,वाचन कोपरा इ.राबवले जातात. मुख्याध्यापक व शा व्य स अध्यक्षा श्रीम.राणी धनराज वाघमारे,उपाध्यक्ष संजय राठोड, तज्ज्ञ मार्गदर्शक अॕड.डाॕ.पोळेसर व सर्व सदस्यांनी अभिनंदन व कौतुक केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रकाचे वाटप करण्यात आले.

विशेष लक्षवेधी.

जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा शाळेचा नवीन उपक्रम……

दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी कोणत्याही शाळेत नाही असा “व्यवसाय अभ्यासक्रम” ब्युटी, &वेलनेस” आणि” मल्टीस्किल “उपलब्ध आहे.ज्यामुळे कित्येक मुली 10वी नंतर स्वतः व्यवसाय करत आहेत. त्या स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी कन्या प्रशाला नळदुर्ग येथे प्रवेश घ्यावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड सर व राणी वाघमारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी केले आहे……

प्रतिक्रिया…

इंग्रजी या विषयासाठी प्रशालेमध्ये असलेले (शिक्षक) मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड हे एक नाविन्यपूर्ण इंग्रजीचे जाणकार व विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन अध्यापन करणारे व सील ल प्रज्ञा, करुणा, याचा सुगंध त्यांच्यापासून दरवळतो असे विद्यार्थिनी व पालक वर्गातून व्यक्त होत आहे …म्हणून “असे शिक्षक मिळणे प्रशालेचे भाग्य समजतो ” यासाठी प्रशालेचा गौरव जिल्ह्यामध्ये होत आहे……अध्यक्ष श्रीम राणी धनराज वाघमारे संजय राठोड उपाध्यक्ष व सर्व सदस्य शालेय शिक्षण समिती…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here