भारतीय जनता पार्टी उमरगा मंडळातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

0
10

उमरगा :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी उमरगा मंडळ यांच्यातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण करत, भाजपा कार्यकर्त्यांनी श्रद्धेने आणि कृतज्ञतेने या कार्यक्रमात सहभाग घेतला.लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास हा भारतीय इतिहासातील एक तेजस्वी पर्व आहे. समाजसुधार, कृषीविकास, जलसंधारण, शिक्षण आणि धार्मिक पुनरुत्थान यांतून त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नारी सशक्तीकरण व सामाजिक समरसतेच्या कार्यामुळे त्यांना ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी लाभली.या कार्यक्रमात भाजपा शहर मंडळ अध्यक्ष ॲड. साईराज टाचले, भाजप नेते संतोष वकारे, समर्थ दंडगे, ॲड. यशवंत सांगवे, जालिंदर सोनटक्के, अनुज सगर, श्री. घोडके, भोलेनाथ सुरवसे व संतोष कलशेट्टी यांच्यासह भाजपा उमरगा मंडळातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी उमरगा मंडळ यांच्यातर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यस्मरणास विनम्र अभिवादन करून, त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here