उमरगा : तालुका कृषि अधिकारी ज्ञानोबा रितापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील व्हंताळ येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी आढावा बैठक दि.3 जुन रोजी संंपन्न झाली. यावेळी सोयाबीन बियाण्यांच्या बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी तपासणी बाबत ए. एम. बलसुरे यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यावेळी बियाणे, कीटकनाशक खते खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, कृषि निविष्ठा वाजवी वापर, प्रमुख पिक उत्पादन तंत्रज्ञान, हुमनी किड नियंत्रण,शंखी गोगलगाय नियंत्रण,इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीन, तूर यांची बीबीएफ पेरणी, त्याचे महत्त्व, सोयाबीन टोकन पेरणीबद्दल श्री. रोहित कुलकर्णी कृषि सेवक यांनी मार्गदर्शन केले. व ॲग्री स्टॅग योजने अंतर्गत शेतकरी नोंदणी करण्याचे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आले. तेव्हा यावेळी उपस्थित सरपंच माधव जाधव ,शेतकरी नंदकुमार जाधव,रसूल अत्तार, विठ्ठल जाधव, रामराव पाटील व ईतर शेतकरी बांधव उपस्थित होते.