लोहारा:– छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र भाजपा कार्यकारी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मोदी सरकारचे यशस्वी ११ वर्ष – “संकल्प से सिध्दी तक” कार्यशाळा पार पडली. या कार्मशाळेस धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी सह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्तीनंतर कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी धाराशिव भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार करुण शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दादा दानवे, डॉ.भागवत कराड, मंत्री अतुल सावे, सौ.मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, बबनराव लोणीकर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, लातूर भाजपा जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील, अदि, उपस्थिती होते. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील नव नियुक्त मंडल अध्यक्ष, जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.