उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलला राष्ट्रीय आदर्श शाळा पुरस्कार

0
11

उमरगा :–  येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल ला आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था राळेगणसिद्धी यांच्याकडून दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय आदर्श शाळा पुरस्कार 2025 मिळालेला आहे हा पुरस्कार 3 जून रोजी राळेगणसिद्धी येथे थोर समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष पर्यावरण मित्र देवा तांबे अँड चन्ना शरद बाबू अध्यक्ष बार असोसिएशन सुप्रीम कोर्ट विशाखापटनम, संतोष गायके पोलीस अधीक्षक गोरेगाव मुंबई, विठ्ठलराव जाधव माझी पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे विस्तार अधिकारी संतोष माळी क्रीडा शिक्षक महंमदरफी शेख राम साळुंके,यांनी स्वीकारला गेल्या पाच वर्षात शाळेने गुणवत्ता, पायाभूत सुविधा, पर्यावरण, मुलींचे शिक्षण, शाळेच्या भौतिक गरजा विविध नाविन्यपूर्ण राबविलेले उपक्रम, लोकवाटा, मियावती जंगल निर्मितीतून पर्यावरणाचे केलेले संरक्षण, विविध स्पर्धा परीक्षेतील शाळेचे यश, लाठीकाठी दांडपट्टा कराटे यासारख्या देशी खेळातून मुलींना स्वसंरक्षणासाठी शाळेने केलेले उत्तम कार्य,आदि शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सतत दोन वर्ष आठ लाखाचे मिळवलेले पारितोषिक लिटल प्लॅनेट फाउंडेशन व ऊर्जा कडून महाराष्ट्र व गोवा राज्यातील 10 उत्कृष्ट शाळेत मिळविलेले स्थान व शाळेला मिळालेले पन्नास हजाराचे पारितोषिक या गोष्टींमुळे शाळेला राष्ट्रीय आदर्श शाळा पुरस्कार मिळालेला आहे शाळेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष शिक्षणाधिकारी अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके ,केंद्रप्रमुख शीला मुदगडे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे शिक्षण तज्ञ सदानंद शिवदे पाटील अशोक पतगे अमर वरवटे सुजाता मोरे व शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले शाळेला मिळालेला पारितोषकामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here