उमरगा :- बकरी ईद निमित्त शहर व परिसरातील मुस्लीम बांधवानी कोणत्याही गोवंशीय जनावरांची कुर्बानी टाळून, कायद्याचे काटेकोर पालन करावे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.ईद शांततेत साजरी करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दि.6 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुरेशी/खाटीक समाज,मुल्ला, मौलवी, पोलीस पाटील व शांतता समिती च्या बैठकीत केले आहे.
ठाण्यात अंतर्गत येणा-या गावातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते कि, दि. ०७.०६.२०२५ ते दिनांक ९.६.२०२५ रोजीपर्यंत बकरी ईद निमित्त उमरगा शहर व परिसरात गोवंश हत्या होणार नाही तसेच कोणताही अनुसूचित प्रकार होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनाकडून काळजी घेण्यात यावी, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा १९९५ अनुसार संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी लागू आहे. याची सर्वांना जाण असावी आणि त्या नुसार अचरण करावे. असे यावेळी सांगण्यात आले.याप्रसंगी उमरगा पोलीस ठाणे अंतर्गत येणा-या विविध गावाचे पोलीस पाटील, मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत मौलाना, मुल्ला, मौलवी, पेश इमाम,विविध गावातील, शहरातील कुरेशी, खाटीक, शांतता समितीचे विविध जाती धर्मातील प्रतिष्ठीत व्यक्ती आदी मान्यवर दि.6 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित होते.