लोहारा:–धाराशिव शहरातील प्रेरणा नगर येथे शिवसेना महिला आघाडी शाखेचे उद्घाटन गुरुवारी दि.12 जून रोजी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले, धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके, जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ.भारतीताई गायकवाड, जिल्हा संघटक सौ. किरण निंबाळकर, तालुका अध्यक्ष सौ. माया निंबाळकर, प्रेरणा नगर शाखेच्या प्रमुख मनीषा लोखंडे, शाखा उपप्रमुख पुष्पा भुतेकर, शाखा सचिव हिरा कुंभार, सहसचिव सोनाली रोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिवसेना महिला आघाडीने धाराशिवमध्ये संघटनात्मक ताकद उभी करून महिलांसाठी नवे पर्व सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला आघाडीच्या शाखा स्थापन करून शिवसेनेच्या महिला आघाडीचे संघटन वाढविण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत आहे. शाखा उदघाटन कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.