कोरेगावाडी येथील शिवाई च्या 32 विद्यार्थ्यांची  कॅम्पस मुलाखतीत निवड 

0
354

उमरगा :– तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी येथे बी. फार्मसी व डी. फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता दि.11 रोजी   कॅम्पस इंटरव्ह्यूव आयोजित करण्यात आले. यावेळी टेककेअर मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, शाखा पुणे व मुंबई येथील संग्रामसिंह पवार, कमल कुमार यांनी मुलाखती घेतल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव विजय बेडदुर्गे व उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती.

 

यावेळी कमल कुमार व संग्राम सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन यामध्ये महाविद्यालयातील 32 विद्यार्थ्यांची पुणे व मुंबई शाखेसाठी निवड केली. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी जाताना कशी तयारी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे यांनी शुभेच्छा दिल्या. प्लेसमेंट सेल ऑफिसर प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अशोक गायकवाड यांनी मेहनत घेतली. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.मंजुषा गव्हाळे व विद्यार्थी उपस्थित होते.प्रा.धनश्री भुजंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here