हिप्परगा रवा येथे बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक व वृक्ष लागवडी बाबत मार्गदर्शन

0
192

लोहारा :–  तालुका कृषी विभागाच्या वतीने लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा ग्रामपंचायत रवा येथे दि.13 जून 2025 रोजी बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक व वृक्ष लागवडी बाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्माच्या अध्यक्षस्थानी सरपंच अभिमान कांबळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, सहायक कृषी अधिकारी चंद्रकात पाटील, पंचायत समितीचे विस्ताराधिकारी गडदे तर प्रमुख म्हणुन मा.उपसरपंच विजय भैय्या लोमटे, उपसरपंच सुनील जाधव, ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर, बाजीराव जाधव, विनोद मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव जाधव, हरिभाऊ गवळी, अशोक मोरे, ज्ञानेश्वर मोरे, दत्तात्रय पाटील, मनोज गवळी, सत्यजित भोसले, बालाजी मुळे, बाळासाहेब वाघमारे, विशाल लांडगे, विजय पवार, अनिकेत जाधव,अदि उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी महेश देवकते व सहायक कृषी अधिकारी चंद्रकात पाटील यांनी बियाणे उगवण क्षमता व वृक्ष लागवडी बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. व तसेच पंचायत समितीचे विस्ताराधिकारी गडदे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here