नळदुर्ग शहरातील चौघांची भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती

0
73

नळदुर्ग  :–  शहरातील कायदे विषयक सल्ला देणारे ॲड. मतीन हमीद बाडेवाले ,ॲड .अभिजीत बाबुराव बनसोडे, ॲड. सुजित बापूराव गायकवाड, ॲड. संदीप सुधाकर सातपुते या चौघांना नुकतीच भारत सरकार नवी दिल्ली मार्फत नोटरी पदी नियुक्तीचे पत्र मिळाले आहे. त्यांना भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाल्यामुळे तुळजापूर तालुका व नळदुर्ग परिसरातील लोकांना नोटरी करण्यासाठी सोयीचेे  झाले आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरीकासाठी लोकांना नोटरी करण्यासाठी इतर कोठे ही बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही त्यामुळे तुळजापूर तालुका व नळदुर्ग परिसरातील लोकांचा वेळ व पैसा आता वाचणार आहे.ॲड. मतीन बाडेवाले ॲड अभिजित बनसोडे ॲड सुजित गायकवाड ॲड संदीप सुधाकर सातपुते यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झाल्याने तुळजापूर तालुक्यातील व नळदुर्ग परिसरातील मित्र परिवार व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघटना ,वकील संघ , स्टॅम्प वेंडर असोसिएशन, बँकिंग असोसिएशन यांच्याकडून स्वागत केले जात आहे.शहरात प्रथमच चौघा वकीलांना नियुक्ती पत्र मिळाल्याने आनंद साजरा करण्यात येत आहे . सर्वांचं अभिनंदन व कौतुक होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here