लोहारा :- तालुक्यातील हिप्परगा रवा जि.प.प्रा. शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली प्रवेशित मुलांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी लोहारा तालुका गटविकास अधिकारी श्रीमती शितल खिंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी जगदेव वग्गे, हिप्परगा रवा ग्रामपंचायत सरपंच अभिमान कांबळे, उपसरपंच सुनील जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यदेव जाधव, उपाध्यक्ष श्रीमती अश्विनी मोरे, सदस्य मोहन गवळी, अमोल जाधव, सुशांत मोरे, अमोल लोमटे, गणेश कांबळे श्रीमती अंजली गोरे श्रीमती सुषमा मोरे, श्रीमती सोनाली मोरे, ग्रामसेवक सारंग मुंडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्रीमती उलन कांबळे, हरिदास साळुंखे, नागेश बंगले, नरेंद्र औटे, संभाजी परीट, सुधाकर घोडके, श्रीमती मनीषा भोजने, श्रीमती पद्मावती देशमुख, परिश्रम घेतले.