लोहारा तालुका भाजपाची बैठक  संपन्न 

0
54

लोहारा :– भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा बूथ समिती गठन करण्यासंदर्भात लोहारा तालुका भाजपाची बैठक दि.18 जून 2025 रोजी शहरातील सुतार कॉम्पलेक्स येथे जिल्हा संयोजक बूथ समिती गठन अध्यक्ष दत्ताभाऊ राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संकल्प ते सिद्धी जिल्हा संयोजक शिवाजीराव गिड्डे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी जिल्हा संयोजक बूथ समिती गठन अध्यक्ष दत्ताभाऊ राजमाने व संकल्प ते सिद्धी जिल्हा संयोजक शिवाजीराव गिड्डे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीस भाजपा माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका चिटणीस प्रविण चव्हाण, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण (जेवळी), बालाजी चव्हाण (सालेगाव), युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, प्रसिद्धी प्रमुख निकेश बचाटे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयेश दंडगुले, काशीनाथ घोडके, शिवाजी पवार, गणेश रवळे अनिकेत फरिदाबादकर, यांच्यासह शक्तिकेंद्र प्रमुख, तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here