लोहारा:– शहरात माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयात दि.19 जून 2025 रोजी 59 वा शिवसेना वर्धापनदिन साजरा करण्यात आला. 59 वा शिवसेना वर्धापनदिनानिमित्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, माजी गटनेतेअभिमान खराडे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, नगरसेवक गौस मोमिन, नगरसेवक विजयकुमार ढगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक आयुब शेख, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, के.डी.पाटील, ओम कोरे, नगरसेवक आरिफ खाणापुरे, देवा महाजन, सुखा सातपुते, श्रीकांत बिराजदार, रोहण खराडे, उपस्थित होते.