भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम ;  परंडा शहरासह तालुक्यातील कष्टकरी, कामगारांना मोठी छत्री वाटप

0
29

लोहारा :– भारतीय जनता पार्टी चे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील कष्टकरी, कामगार यांना पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी एक मोठी छत्री वाटप करण्यात आली. परंडा तालुक्यातील गरीब कष्टकरी, कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी रोज ऊन, वारा, पावसात काम करतात. या गोर गरीब कष्टकरी जनतेला ऊन्हात व पावसाळ्यात होणारी अडचण लक्षात घेऊन भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या स्वखर्चाने मोठी छत्री देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.संतोष सुर्यवंशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, शहर उपाध्यक्ष धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, आदर्श ठाकूर, अमर ठाकूर, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, रामदास गुडे, किरण कवटे, हिमालय वाघमारे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here