उमरगा येथील एस बी आय बँकेच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

0
71

उमरगा :– शहरातील भारतीय स्टेट बँकेतर्फे ७० व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी दि २१ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात बँकेचे अधिकारी, कर्मचारी,खातेदार,नागरिकांसह एकूण ७६ जणांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराला शहर व परिसरातील नागरिकांतुन उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला. बदलत्या जीवनशैलीमुळे आजच्या परिस्थितीत नागरिकांना विविध आजार होताहेत, त्यात वाहन अपघातांची संख्याही वाढत आहे. रुग्णालयातील उपचारादरम्यान संबंधित व्यक्तींना रक्ताची गरज भासते. अशा स्थितीत रक्ताचा तुटवडा असल्यानंतर रुग्णांना इतर जिल्ह्याला सोलापूर,लातूरला जावे लागते. अशी वेळ कोणावरही येऊ नये, या जाणिवेतून भारतीय स्टेट बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाशेजारील बँकेच्या प्रांगणात मुख्य शाखा आणि कहाविद्यालया शेजारील शाखेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेतले. शिबिराचे उदघाटन उमरगा पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.शितल रासकर,डॉ पद्माकर चांदणे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्थे दिपप्रज्वलन करून व उपस्थित नागरिकांना बँकेचे कार्य आणि रक्तदानाचे महत्व सांगून शिबिराला सुरुवात करण्यात आली.   गंभीर आजारातील रुग्णांसह प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होणाऱ्या महिला, अपघातात जखमी होणाऱ्यांना वेळप्रसंगी रक्त न मिळाल्याने त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. ही बाब लक्षात बँकेने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर कौतुकास्पद असल्याबाबत पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी यावेळी म्हणाल्या..या रक्तदान शिबिरात एकूण 76 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून प्रत्येक रक्तदात्यास बँकेतर्फे भेट वस्तू देण्यात आल्या.यावेळी माडज शाखेचे अनिरुद्ध बोरकर,मुरूम भगवान भोपळे,डाळिंब शाखेचे मनोजकुमार जरूपला,गुंजोटी शाखेचे रोहित मेश्राम,बलसुर शाखेचे काशिनाथ मठपती, क्षेत्र अधिकारी शैलेश बिराजदार, आशिष गौरीकर,धीरज धनिधर आदीं बँक अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here