लोहारा :– “एक देश मे दो विधान, दो निशाण, दो प्रधान नही चलेंगे” चा नारा देत अखंड भारतासाठी बलिदान देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिना निमित्त भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी, माजी तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड.भालचंद्र औसरे, ओ. बी.सी.मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. तानाजी वाघमारे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता.सरचिटणीस तानाजी पाटील, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, शिवाजीराव पाटील, रामदास गुडे, जयंत सायकर, धनंजय काळे, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, अमर ठाकूर, सुरज काळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.