उमरगा :– आपण रोज पाहतो पोलिस हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास तत्पर असतात. जे समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी समर्पित आहे. त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या या योगदानामुळेच आपण सुरक्षित आणि समाधानी जीवन जगू शकतो. पोलीस व होमगार्ड यांच्यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय, संस्था उमरगा व जी.के.फाउंडेशन पुणे, कमल मेडिकेअर कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी पोलीस ठाणे उमरगा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार होते तर उद्घाटक म्हणुन डॉ.कपिल महाजन प्रमुख पाहुणे म्हणुन युवासेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड व ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा तथा युवती सेना मराठवाडा निरीक्षक ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले, उमरगा पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले, जी.के.फाउंडेशन प्रमुख मार्गदर्शक सुधीर थोरात, लोहारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, मुरूम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.
शिबिरामध्ये शुगर(मधुमेह), कोलेस्ट्रॉल(हृदयासाठी), इसीजी, सीबीसी, बीपी, डोळे(नेत्र) तपासणी आदी तपासण्या अनुभवी व तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आल्या. तपासणी अंती जर कोणाला शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास हृदयरोग, सर्व प्रकारचे कॅन्सर, रेडिएशन व केमोथेरपी, मोतीबिंदू या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. कार्यक्रमास पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी 223 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली .यावेळी शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, डॉ.जयभारत भालके, जी.के.फाउंडेशन चे गुंडप्पा खडके, पोलीस उप निरीक्षक पुजारवड, सहाय्यक पोलिस निरीक्षक कन्हेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भराडे, सचिन जाधव, शहर प्रमुख योगेश तपसाळे, युवा सेना विधानसभा प्रमुख शरद पवार, मीनाक्षीताई दुबे, नाना मदनसुरे, अमर देशटवार, अरुण जगताप, उद्धव मुळे, अमर शिंदे, शहाजी येळीकर, संजय माने, राहुल शिंदे, डॉ.फरीद अत्तार, अमर शिरोळे आदीं जण उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.अनिषा फुगटे यांनी केले व संदीप चौगुले, मनोज जाधव, निरंजन कटके, सूरज कटके आदींनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले.