कदेर येथील रस्त्याची झाली दुरावस्था 

0
198

 

उमरगा :–  तालुक्यातील कदेर येथील रस्त्यात ठिकठिकाणी दगड गोटे पडले असल्याने वाहनधारकांना ये जा करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यात मोठमोठाले खड्डे रस्त्यावर साचणारे पाणी तर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाला आहे.रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिले होते मात्र सर्व गावातील रस्त्याची दुर्दशा जल जीवन मिशन यायोजनेच्या पाईप लाईन ने रस्ते व गावातील गठारी गल्ली बोळात जोडणाऱ्या या रस्त्याची चाळण झाली असून मोठ – मोठे खड्डे पडले आहेत. कदेर ग्रामपंचायतीने 2 दिवसापूर्वी रस्तावर साचणाऱ्या पाण्यासाठी मुरूम टाकण्या ऐवजी त्या ठिकाणी दगड गोटे आणून टाकले त्यामुळे वाहतुकीस अडथळा, अतिक्रमण धारकाचे साम्राज्य या रस्त्यावर आहे.गटार आणि पाण्याच्या नीचारा व रस्त्याचे मोजमाप न करता सिमेंट रस्ता अरुंद झाला आहे.

 

त्यामुळे अतिक्रमण करण्यास मोठा वाव मिळाला आहे. या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात दगड गोटे पडल्याने शाळकरी मुले, वृद्ध लोकांना व मोटर सायकली फोर व्हिलर जाणे मुश्किल झाले आहे .गावची पारख रस्त्यावरून केली जात असून गावाला जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसेल तर या गावाकडे वाहन धारक देखील येण्यास टाळाटाळ करतात. लहान – सहान व्यवसायिक देखील या गावाकडे फिरकत नाही. त्यामुळे गावाला अपरिमित अशा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावरून जात असताना रस्त्यात खड्डा आहे,की दगड गोटे आहेत की पाण्याचे साचलेले खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजून येत नाही. या याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी देवून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.ठिकाणचे रस्ते खराब पाण्याचे साचलेले खड्ड्यात रस्ता असाच प्रकार ग्रामीण भागातील रस्त्यांवर आढळून येतो. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात अनेक गावातील ठिकाणी रस्ते खराब झाले असून शासन, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसा रस्ता दुरुस्त करण्यात आला नसल्याचे नागरिक सांगतात. या रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडले असून पाण्याचे साचलेले खड्ड्यात रस्ता ग्रामपंचायत यांनी मुरूम आणून टाकण्या ऐवजी दगड गोटे आणून टाकले त्यामुळे वाहन धारकाना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ – मोठे दगड गोटे पडल्याने चालवता येत आहे. शेतकरी,विद्यार्थी,वाहनधारक यांना सहन करावा लागतोय त्रास या रस्त्यावरून शेतकरी दूध घेवून जात असताना त्यांच्या दुधाचे कॅन पलटी होवू लागले आहेत. या रस्त्यावर दोन ते तीन फुटाचे खड्डे पडल्याने त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्यात ठिकठिकाणी दगड गोटे पडले असल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर या गावातील विद्यार्थी शाळा,कॉलेजला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करत असून त्यांना खड्डेमय रस्त्यामुळे वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. वाहन धारकांना या रस्त्यावरून जात असताना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या वाहनाचे दररोज नुकसान होत असून रस्त्याचे काम लवकर करावे,अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here