बीरुदेव मंदीरा समोरील  रोडवर दुचाकीचा अपघात ; महिला जखमी 

0
1301

उमरगा :–  तालुक्यातील  लातुर- उमरगा रोडवरील बीरुदेव मंदीरा समोरील रोडवर दि. 3 रोजी दुपारी ठीक 2ः15 वाजता उमरगा येथुन एकुरग्या कडे जाणारी दुचाकी  ही एम आय डी सी जवळ येताच  दुचाकीवर चालकाच्या पाठी मागे बसलेली महीला ही अचानक दुचाकीवरून  खाली पडल्याने सदर  महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. आरती महेश पांचाळ वय- 23 रा. एकुरगा ही महिला जखमी झाली आहे.  सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे आहो रात्र अपघात ग्रसताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला खाजगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here