तालुक्यातील 80 सरपंच पदाची  आरक्षण सोडत 10 जुलै रोजी 

0
224

 

उमरगा :– तालुक्यातील 80 सरपंच पदाची आरक्षण सोडत दि 10 जुलै रोजी शहरातील अंतुबळी  पतंगे सांस्कृतिक सभागृहात उमरगाचे उपविभागीय अधिकारी दत्तु  शेवाळे  यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आल्याची माहिती उमरगा चे तह‌सिलदार गोविंद येरमे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून 4 जुलै  रोजी दिली आहे.

ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडील शासन अधिसूचना क्रमांक 213 दिनांक 13 जून 2025 व मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांची अधिसूचना दिनांक 03/07/2025 नूसार महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) नियम 1964 मधील नियम 3(अ), (ब) तसेच 4 प्रमाणे तालूक्यातील 80 सरपंचाची पदे सन 2025 ते सन 2030 या पाच वर्षाच्या कालावधीकरीता वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलासाठी आरक्षीत करुन संख्या निश्चीत करण्यात आलेल्या आहेत. त्याकरीता सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यासाठी  उपविभागीय अधिकारी उमरगा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10/07/2025 रोजी 11.00 वाजता अंतू-बळी पतंगे सांस्कृतीक सभाग्रह, उमरगा येथे आयोजीत करण्यात आलेली आहे.तरी तालूक्यातील नागरीकांना तसेच सर्व पक्षाचे नेते/कार्यकर्ते, ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी सरपंच  पद आरक्षण सोडतीच्या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  तहसिलदार गोविंद येरमे यांनी केले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here