ज्ञानाने संपन्न पिढी हीच राष्ट्राची खरी शक्ती– प्रा.डॉ.यशवंत पाटणे

0
80

 

उमरगा :–  ज्ञानाने संपन्न पिढी हीच राष्ट्राची खरी शक्ती असते, ध्येयवादी शिक्षक आणि गुणवान विद्यार्थी समाजाचे वैभव वाढवित असतात. त्यांना प्रदान केला जाणारा ज्ञानज्योती पुरस्कार हा ज्ञानसंस्कृतीचा सार्थ गौरव आहे, असे मत प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.यशवंत पाटणे सर यांनी व्यक्त केले. शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउददेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार दि.6 जुलै रोजी उमरगा शहरातील ओम बालाजी मंगल कार्यालयात आयोजित ज्ञानज्योती गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. प्रा.रविंद्र गायकवाड सर, उदघाटक माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अभय भैय्या चालुक्य, विभागीय निरीक्षक युवासेना मराठवाडा किरण गायकवाड, ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ॲड. आकांक्षा चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, लोहारा नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपुत, शिवकुमार बिराजदार, उषाताई गायकवाड, ज्योतीताई चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. पाटणे म्हणाले की, शिक्षण हे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशदवार असते. बहुजन समाज शिक्षणापासुन वंचित राहिला तर येणाऱ्या पिढया आर्थिक आणि सामाजिकदृष्टया दुबळया होतील, हे ओळखुन महात्मा फुले आणि क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांनी अनेक ज्ञानज्योती फुलविल्या. राजर्षी शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनदलीत लेकरांचया शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, तोच वारसा माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी जपला. ज्ञानज्योती सामाजिक बहुउददेशीय संस्था ही समाजासाठी उर्जापीठ आहे. सध्या अतिरेकी चंगळवादामुळे तरूणपिढी दिशाहीन होत चालली आहे. अशा काळात शिक्षकांनी जागरूक राहुन मुलांच्या मनात सदगुणांची बीजे पेरली पाहिजेत. गरिबीवर मात करण्यासाठी त्यांना ज्ञानश्रीमंत आणी जिददी बनविले पाहिजे. शिक्षणातुन समाजोपयोगी आणि सुजाण माणुस घडला पाहिजे. गुणवत्ता म्हणजे परिक्षेतील गुणांची टक्केवारी नसते तर टक्के-टोणपे खाऊन मिळवलेले यश म्हणजे खरी गुणवत्ता असते. गुणवत्ता वाढीसाठी संधीची आणि प्रोत्साहनाची गरज असते. स्वसामर्थ्याची जाणीव हा स्वउध्दाराचा आरंभ असतो. हे मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १) प्रा.शिवमूर्ती भांडेकर रा.आलूर (शिक्षण व साहित्य) २) प्रा.कांतराव सोमवंशी रा.आष्टा का., (प्रसिद्ध बासरीवादक) ३) श्री.योगीराज माने रा.तुगाव (ज्येष्ठ कवी व साहित्यिक) ४) रणजीतसिंह ठाकूर रा.उमरगा (क्रीडा – राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू), ५) देवीसिंग भीमसिंग राजपूत रा.येणेगुर (ज्येष्ठ पत्रकार) ६) श्री.गोविंद पवार रा.सास्तूर (प्रगतशील शेतकरी) ७) माधव मारूती जाधव रा.व्हंताळ (आदर्श सरपंच) ८) सौ.वर्षा किशोर माने रा.दाबका (महिला गृह उद्योजिका) यांना यंदाच्या ज्ञानज्योती पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १० वी वर्गात प्रथम व द्वितीय आलेल्या व इयत्ता १२ वी मध्ये प्रथम (शाखानिहाय) आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चि.प्रतिक कांबळे, रा.त्रिकोळी, चि.विशाल शेटगार रा.गुंजोटी, चि.कृष्णा लडडा रा.कलदेव निंबाळा, कु.अंबिका जमादार रा.हिप्परगा राव कु.ऋतीका भोसले या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संस्थेने दरमहा शिष्यवृत्ती सुरू केली. त्याचा पहिला धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.आकांक्षा चौगुले व सुत्रसंचालन संदीप जगताप, आरोही जमादार यांनी केले तर आभार उपाध्यक्ष विजय वडदरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष विजयकुमार वडदरे, सचिव प्रदीप मदने, कोषाध्यक्ष अमर देशटवार, संचालक कुमार निकम, राजा देशेटटी, शुभांगी जगताप, बी.के.पवार, पंढरीनाथ कोणे, चंद्रशेखर सूर्यवंशी, नाना मदनसुरे, गोपाळ जाधव, अशोक पतगे, शेखर घंटे, शरद इंगळे, हनमंत गुरव, संदीप चौगुले, मनोज जाधव, अदिंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here