मोहरम व आषाढी एकादशी निमित्त मिलाप मित्र मंडऴाच्यावतीने लोहारा शहरात मसाला दुध वाटप

0
130

लोहारा:– मोहरम व आषाढी एकादशी निमित्त मिलाप मित्र मंडऴाच्यावतीने सामाजिक भावना जपत लोहारा शहरात मसाला दुध वाटप करण्यात आले. यावेळी मसाला दुध वाटपाचा शुभारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे व शिवसेना नेते राजेंद्र माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू फज्जुसाब कादरी, उपनगराध्यक्ष हाजी अमिन सुंबेकर, शिवसेना जिल्हा उप प्रमुख शब्बीर गवंडी, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, माजी नगरसेवक आयुब शेख, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, हाकीमभाई थाणे, डॉ.आम्लेश्वर गारठे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, माजी नगरसेवक श्रीनिवास माऴी, कॉग्रेसचे ईस्माईल मुल्ला, मेडीकल असोशिएन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष उमेश देवकर, खाशिम मुल्ला, अस्लम आत्तार, जिंदावली शेख, नयुम सवार, यांच्यासह हिंदु, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here