बीकॉम प्रथम वर्षातील  विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत

0
51

उमरगा :–  येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच नियमित वर्ग सुरू झाले आहे. दिनांक 07 जुलै रोजी सुरू झालेल्या नियमित वर्गात विद्यार्थ्यांच पुष्प देऊन स्टाफ च्या वतीने स्वागत आणि शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांनी फायनान्शिअल अकाउंटिंग या विषयाची पहिली तासिका घेताना विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत करिअर करताना सर्वांगीण विकास करण्यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विविध कौशल्य विकसित करावीत असे आवाहन केले, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रवेश घेतल्या नंतर महाविद्यालयात आणि वाणिज्य विभागात मिळणाऱ्या शिक्षणाचा आणि वेळेचा उपयोग कसा करून घ्यावा, वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्या नंतर त्यात करिअर कसे घडवावे, महाविद्यालयात मिळणाऱ्या सोयीसुविधाबद्दल आणि चालू शैक्षणिक वर्षात होणारे बदल, NEP 2020 अभ्यासक्रम, याबद्दल सखोल मार्गदर्शन प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले. यावेळी वाणिज्य विभागातील शिस्त बद्ध नियोजन आणि वागणूक याबद्दल सखोल मार्गदर्शन विभाग प्रमुख प्रा डॉ अजित आष्टे यांनी केले. यावेळी वाणिज्य विभागातील डॉ विजयकुमार मुळे, प्रा. खंडू मुरळीकर, प्रा. ओमप्रकाश पवार, प्रा संध्या चौगुले, प्रा विद्या गायकवाड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here