लोहारा :– लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड लोहारा (खुर्द) कारखान्याचे मिल रोलर पूजन दि.8 जुलै रोजी ह.भ.प. रामकृष्ण महाराज कानेगावकर व कारखान्याचे संचालक प्रशांतजी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. येणाऱ्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर कारखाना गाळपाकरिता सज्ज करावा, असे आवाहन कारखान्याचे संचालक प्रशांतजी पाटील यांनी यावेळी केले. याप्रसंगी कारखान्याचे वरिष्ठ सरव्यवस्थापक छगनजी भोगाडे, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


