उमरगा:– तालूक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी अंतू-बळी पतंगे सभागृह उमरगा येथे दि.10 जुलै रोजी आरक्षण सोडत सभा आयोजीत करण्यात आली होती. तालुक्यातील एकुण 80 ग्रामपंचायतीचे सन 2025 ते 2030 या कालावधी करीता सरपंच पदाचे आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांची अधिसूचना क्र. 2025/सा.प्र/ग्रा.पं.नि./का-1/सि.आर-02 दिनांक 03 जूलै 2025 अन्वये आदेशीत केले आहे. सदर बैठकीसाठी जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार उमरगा चे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीस उपस्थितीत विविध गावातून आलेल्या नागरिकांच्या स्वाक्ष-या घेण्यात आल्या.बैठकीस उपस्थितीत असलेल्या सर्व मान्यवरासमोर जिल्हाधिकारी धाराशिव यांची अधिसूचना 2025/सा.प्र/ग्रा.पं.नि./का-1/सि.आर-02 दिनांक 03 जूलै 2025 अन्वये सरपंच, उपसरपंच निवडणूक नियम 1964 मधील नियम 3 (अ) (ब) प्रमाणे उमरगा तालुक्यातील एकूण 80 ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चीती करण्यात आले. प्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण व प्रवर्ग निहाय स्त्रियांचे आरक्षण खालील प्रमाणे काढण्यात आले







