लोहारा :– लातूर जिल्ह्यातील चाकुरचे माजी नगराध्यक्ष कपिल माकणे व निळकंठ मिरकले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेश कार्यालय, मुंबई येथे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाची विकसनशील वाटचाल व जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन कपिल माकणे, निळकंठ मिरकले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रवेश सोहळ्यादरम्यान मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, खासदार डॉ.अजित गोपछडे, माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर, अर्चना पाटील चाकूरकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, रामचंद्र तिरुके, वसंत डिघोळे, युवराज पाटील, सिद्धेश्वर पवार यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


