उमरगा :- तालुक्यातील तलमोड येथील एकाच्या घरात सुरु असलेल्या तिरट जुगाराच्या ठिकाणावर उमरगा पोलीसांनी छापा टाकून 274530 रुपयाच्या मुद्देमाला सह 10 जुगारींना जेरबंद केल्याची घटना दि.10 जुलै रोजी घडली आहे.
दि.10 रोजी गुरूपौर्णिमा व अचलबेट यात्रे निमित्त उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोहेको अनिल बोदमवाड, पोना यासीन सय्यद, पोना अनुरुद्र कावळे, चालक पोकों/ राजेश बादे असे शासकीय निळुन जिप क्र. MH-25-AW-7842 रोडवर पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना गुप्त माहिती मिळाली की, मौजे तलमोड येथे निसार शमशोद्दीन मसलगे हा त्याचे जुने घरात तिरट नावाचा जुगार अड्डा चालवुन लोकांना बसवुन जुगार खेळवित आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व सोबतचे स्टाफ व पंच असे मिळुन 1820 वा छापा मारून सदर घरात तिर्रट नावाचा जुगार खेळणारे अर्जुन मुरलीधर साळुंके वय 34 वर्षे रा. तलमाङः ताः उमरगा, रणजीत भिमसेन मेकाले वय 43 वर्षे रा. थोरलीवाडी, ता. उमरगा, लक्ष्मण निवृत्ती माळकरी वय 50 वर्ष रा. जोगेवाडी ता. बसवकल्याण जि. बीदर, काशिनाथ राम ढोणे वय 40 वर्षे रा. धाकटीवाडी, ता. उमरगा, प्रकाश बाबुराव मोरे वय 60 वर्षे रा. तलमोड ता. उमरगा, पांडुरग सिद्राम बिराजदार वय 39 वर्षे रा. उरकी ता. बसवकल्याण , रंगराव मनोहर दुर्गे वय 31 वर्ष रा. लाडवंती ता. बसवकल्याण, बळीराम मुकींदराव मुरंबे वय 55 वर्षे रा. भोसगा ता. बसवकल्याण गोविंद प्रभु पालमपल्ले वय 42 वर्षे रा. मोरखंडीवाडी ता. बसवकल्याण यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन रोख रक्कम 31500 रू. व 08 मोबाईल, 03 मोटार सायकल असे एकुण 2,74,500 रू.चा मुद्देमाल व तिर्रट जुगाराचे साहित्य जप्त करून जुगार अड्डा चालक निसार शमशोद्दीन मसलगे रा. तलमोड ता. उमरगा व तिरट जुगार खेळणारे 09 इसम अस एकुण 10 जणाविरूध्द पो.स्टे. उमरगा गु.र.नं. 455/2025 कलम 4/25 महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन तपास पोहेकॉ/133 व्ही. के. मुंडे हे करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोहेकॉ अनिल बोदमवाड,शवलिंग घोळसगांव पोना यासीन सय्यद, पोना अनुरूद्र कावळे चालक पोकों राजेश वादे यांनी केलेली आहे.


