प्रवाशांच्या सोयीसाठी उमरगा आगाराला नवीन 5 बसेस 

0
209

 

उमरगा :– प्रवाशांच्या सोयीसाठी उमरगा आगारासाठी नवीन आणखी 5 बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व महायुती शासनाचे शिवसेना उपनेते तथा उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आ. ज्ञानराज चौगुले यांनी आभार मानले आहे.

 

प्रवाशांच्या सोय व्हावी, उमरगा आगारासाठी नवीन बसेस देण्यात, याव्यात,अशी मागणी व पाठपुरावा शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले यांनी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उमरगा आगारासाठी नवीन 5 बसेस उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रवाशांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उमरगा आगारासाठी नवीन 5 बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मन:पुर्वक आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here