लोहारा :– भारतीय जनता पार्टी लोहारा तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील व उमरगा ग्रामीण मंडळ अध्यक्ष पदी सिध्देश्वर माने यांची निवड झाल्याबद्दल उमरगा शहरातील शासकीय विश्राम गृह येथे दि.16 जुलै रोजी भाजपा नेते तथा जि.प.चे बांधकाम व अर्थ माजी सभापती अभय भैय्या चालुक्य यांच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, भाजपा माजी तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, प्रविण चव्हाण, बालाजी बऴीराम चव्हाण, बालाजी चव्हाण, भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष संजय कदम, माजी तालुका सरचिटणीस सागर पाटील, मोहन जेवऴीकर, नितीन दंडगुले, काशीनाथ घोडके, मोहन जेवऴीकर, सौरभ कागे, राजेंद्र गायकवाड, महादेव कोरे, राहुल कोरे, बसवराज कोंडे, राम लोहटे, अॅड.सुशिल शिंदे, रविंद्र चव्हाण, यांच्यासह उमरगा, लोहारा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


