महाराष्ट्र एसटी कामगार संघटनाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना विविध मागण्याचे निवेदन

0
192

उमरगा :– धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उमरगा बस स्थानकाचे दि. 19 रोजी सायं. 6 वाजण्याच्यासुमारास भूमिपूजन करण्यात आले,याप्रसंगी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना उमरगा शाखा च्यावतीने त्यांना विविध संदर्भात असलेले निवेदन देण्यात आले.निवेदनात राज्य शासकीय कर्मचारी यांच्याएवढी पगार एसटी कर्मचारी यांना मिळावी, महागाई भत्त्याचा फरक जुलै 2018 ते 2025 या कालावधीचा मिळण्यात यावा,शासकीय घर भाडे जसे शासकीय कर्मचारी यांना भेटते तसेच एसटी कर्मचारी यांना भेटावे ,भविष्यामध्ये होणा-या कर्मचारी भरतीत कामगारांच्या पाल्यांना किंवा नातेवाईकांना दहा टक्के समांतर आरक्षण देण्यात यावे,नवीन बस स्थानक निर्मितीमध्ये राप कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बस स्थानकामध्ये वाणिज्य स्थापना साठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे जसे की दुकान, स्टेशनरी, चहा स्टॉल आणि बेकरी इत्यादी जी की वाणीज्य आस्थापना असतील त्यामध्ये प्रथम प्राधान्याने रा.प. कर्मचारी यांच्या कुटुंबियांचा विचार करण्यात यावा. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सदर निवेदन पालकमंत्री यांना देताना महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्ष संजय कुंभार, सचिव घोगरे, उपाध्यक्ष बनसोडे, प्रविण रणखांब प्रसिद्धी प्रमुख कुलकर्णी, सभासद किरण जाधव, कालिदास जाधव,एसटी बँक संचालक जयवंत जाधव इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here