एकल महिलांच्या गरजूवंत 57 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

0
270

 

उमरगा:– साऊ एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य नियंत्रक हेरंब कुलकर्णी व खासदार  ओम प्रकाश राज निंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह उमरगा.येथे कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या व एकल महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले व मान्यवरांचा सत्कार उपस्थित एकल महिलांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.प्रस्तावना मांडत असताना विजय काका जाधव यांनी सांगितले की परंपरेला बाजूला ठेवून समाजातील एकल महिला ज्यांचे पती गेल्यामुळे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन एक प्रकारे वेगळा असतो हाच विचार बदल व्हावा म्हणून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे व एकल महिला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले राज्यातील साऊ ए.म.पु. समितीच्या वतीने हा उपक्रम राज्यभर राबवला जात आहे. त्या अनुषंगाने उमरगा-लोहारा तालुक्यातील अशा 57 विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार जसे वडिलांकडे हक्काने जे साहित्य मागितले जाते तशाच स्वरूपात मागणीनुसार शिक्षणासाठी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वस्तू त्यांना देण्यात आल्या , यासाठी 80,000 हजारापेक्षा जास्त खर्च आला असून त्यापैकी 50 टक्के खर्च समितीचे राज्य नियंत्रक हेरंब कुलकर्णी  यांनी जमा केलेल्या निधीतून उमरगा-लोहारा तालुक्यासाठी देण्यात आला, राहिलेल्या उर्वरित रकमेची पूर्तता कालच्या कार्यक्रमांमध्ये  तहसीलदार गोविंद येरमे , तहसील कार्यालय उमरगा,छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय अस्वले ,संजय सरपे सेवानिवृत्त उपविभागीय जलसंधारण अधिकारी या मान्यवरांनी उर्वरित रक्कमे साठी मदतीचे आश्वासन दिले आहे. कार्यक्रम घेत असताना असे निदर्शनास आले अतिशय गंभीर परिस्थितीला प्रत्येक एकल महिलांनी तोंड देत मुलं-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी, कोणी शेतमजुरी, धुनी, भांडी, अनेक क्षेत्रातील मजुरी करणाऱ्या एकल महिलांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू नये अशा समाजातल्या गरजूवंत एकल महिलांना आमच्या समितीने आव्हान केल्यानंतर आपल्या व्यथा मांडल्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.समाजातील सर्व घटकांना अशा विद्यार्थ्यांना आपल्या इच्छेनुसार मदत करावी असे आव्हान साऊ ए.म. पु.समितीचे जिल्हा समन्वयक विजय काका जाधव यांनी केले आहे. यावेळी शासकीय अधिकारी तहसीलदार गोविंद एरमे साहेब यांनी एकल महिला व बालकांना बोलताना सांगितलं की शासकीय महसूल खात्यामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या शासकीय नियमानुसार मंजूर करून देण्याचं आश्वासन दिले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष.उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, यांनी समितीचे काम खूप चांगला असून याच्यापुढे तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून समितीला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अडचण आल्यासमदतीचे आश्वासन दिले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे, नायब तहसीलदार अमीत भारती,डॉ. प्रतापराव देशमुख,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना , प्राचार्य अस्वले  यांनी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांची गुणवंत तपासावी व पालक मेळाव्याला उपस्थित राहून आपले विद्यार्थी खरंच कॉलेजमध्ये जातात शिक्षण शिकतात याची पडताळणी करावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटील व जाधव काका यांचा कोवोड ग्रुप सर्व सदस्य साऊ समितीचे ज्योती माने, हरी माडजे, शंभुलिंग स्वामी, स्मिता चव्हाण, वर्षा स्वामी, ज्योती पुरकर, गौरी पंडित, कविता साळी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक  पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन, ज्योती राजपूत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here