लक्ष्मण पवार
उमरगा :– तालुक्यातील तुरोरी जवळील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे श्रावण मासानिमीत्त २२ दिवशीय श्रीहरी भजनसेवा पर्वाचे आयोजन शुक्रवार दि. २५ जुलै पासून गोकुळाष्टमी शनिवार दि. १६ अॉगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे श्रावण महिन्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत २२ दिवशीय भजनसेवा पर्वाचे आयोजन केले आहे. हभप. श्री. गुरूवर्य उज्वलानंद महाराजांच्या कृपाशीर्वादाने श्रावणातील दर सोमवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन होणार आहे.

यात सोमवार दि. २८ रोजी हभप. जनार्दन महाराज भोसले श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान, सोमवार दि. ४ रोजी हभप. ज्ञानेश्वर महाराज बरमदे हासोरी, शनिवार दि. ९ रोजी पौर्णिमेनिमित्त हभप. उल्हास महाराज माने श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान, सोमवार दि. ११ रोजी हभप. भागवत महाराज पाचंगे कासार बालकुंदा, गोकुळाष्टमी शुक्रवार दि. १५ रोजी रात्री १० ते १२ या वेळेत हभप. जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर तर गोपाळकाला शनिवार दि. १६ रोजी हभप. हरी गुरूजी लवटे महाराज श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान यांचे किर्तन होणार आहे. देवस्थान येथे श्रावणात दररोज भजनसेवा होणार आहे. पंचक्रोशीतील २५० गावातील भजनी मंडळे सेवा करणार आहेत. यात शुक्रवार दि. २५ रोजी उर्की, वडरगा, चिट्टा ( का ), तडोळा, ञिपुरांत, शनिवार दि. २६ रोजी कोळसुर ( का, गु. ) चिंचकोट ( ल. ), रविवार दि. २७ रोजी बंजारा भजन तुरोरी तांडा, मुळज तांडा, दाळींब तांडा, कराळी तांडा, होदलुर तांडा, चिट्टा तांडा, गदलेगाव तांडा, बलसुर तांडा, कोळसुर तांडा, वाडी तांडा, तलमोड तांडा.सोमवार दि. २८ रोजी एकोंडी ( ज. ), चिंचोली ( ज. ), नेलवाड, हिप्परगाराव, बडूर, शिरगुर., नागपंचमी मंगळवार दि. २९ रोजी बाबळसूर, बाबळसूरवाडी, सावळसुर, नारंगवाडी, मातोळा, बोरी, कोरेगाव., बुधवार दि. ३० रोजी कोळेवाडी ( चा ), हंद्राळ ( वाणी), सांगवी ( भि. ), बेडगा, मोरखंडी, संगीत भ. मं. व महादेव भ.मं. उमरगा., गुरूवार दि. ३१ रोजी हासोरी ( खु.), हासोरी ( बु. ), हरीजवळगा, भोसगा, दाबका, शाबीदवाडी, माने गोपाळ, ताडमुगळी., शुक्रवार दि. १ रोजी मुळे हनुमान व विठ्ठल भ. मंडळ, भगतवाडी, तळीखेड,कदमापूर, टाकळी, अनसरवाडा., शनिवार दि. २ रोजी मिरगाळी, शिराढोण, बालकुंदा ( का.), सरदार वाडी, चांदोरी, चांदोरीवाडी, ममदापूर, भक्ती साधना महिला भजनी मंडळ उमरगा., रविवार दि. ३ रोजी गुंजोटी, मळगी, एकंबा, गदलेगाव, हंगरगा ( शि. ), हंद्राळ ( आर ), आष्टा ( जा ), गुरूवाडी, पारसखेडा.सोमवार दि. ४ रोजी विष्णू मंदिर, सोनवणे हनुमान मंदिर भ.मं. कवठा, भुतमुगळी,बोळेगांव, चिंचोली ( स ), जोगेवाडी, नवचंदवाडी, मदारवाडी, रामतीर्थ ( क. )., मंगळवार दि. ५ रोजी भकनाळ, चिंचकोट ( भ ), शिरूरी, चौकीवाडी, कोरेगाव वाडी, मोगरा., बुधवार दि. ६ रोजी सावनगिरा, वडगाव, उजळंब, मुदगडवाडी, गुंजोटीवाडी, धाकलीवाडी, अंबुलगा ( चि. ), मुदगड ( रा. ), कसगीवाडी., गुरूवार दि. ७ रोजी शिरुर, कोयाजीवाडी, लिंबाळा ( दा. ), संगारेड्डीवाडी, सगरेवाडी, कलांडी, केळगाव, सरजवळगा., शुक्रवार दि. ८ रोजी नागराळ, घोटाळ, बंडगरवाडी, तळभोग, येळी, दादगी, कुन्हाळी, चिंचोली ( भु,भं. ), आळंगा., नारळी पौर्णिमा – रक्षाबंधन शनिवार दि. ९ रोजी रामतीर्थ ( आर), निरगुडी, चंडकाळ, कोंगळी, नारायणपूर, लाडवंती, विश्वकर्मा भ. मं. निलंगा, रविवार दि. १० रोजी ञिकोळी, गुगळगाव, नदी हत्तरगा, कोराळी, दगड धानोरा, कोकळगाव, पेठ सांगवी.सोमवार दि.११ रोजी हालसी ( ह.), हालसीवाडी, हत्तरगा ( हा.), कोराळ, औंढा, पौळ अंबुलगा, आनंदवाडी, कोळगाव सांगवी., मंगळवार दि. १२ रोजी गुंजरगा, येळणूर, सावरी, व्होणाळी, रामतीर्थ डी, मानेजवळगा, फुलदरवाडी, तगरखेडा, बेंडगा, बुधवार दि. १३ रोजी जामगा, शेळगी, एकोजी मुदगड, बोटकुळ, हालसी तुगाव, हालगरा, महीला भ. मं. तलमोड., गुरूवार दि. १४ रोजी घाटगेवाडी, सोनखेड, बोरसुरी, तलमोड, तुगाव ( ना.), बामणी, तुकाराम व नाथ भ. मं. तुरोरी, शुक्रवार दि. १५ रोजी गोकुळाष्टमी – कराळी, मळगीवाडी, जगदाळवाडी, डिग्गी. या गावातील भजनी मंडळांची भजन सेवा होणार आहेत. श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री गुरु सेवाधारी भक्त परिवार, परमार्थ प्रबोधन सांस्कृतिक सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


