औराद पाटी जवळील पुलावरुन ट्रक नदीत पडुन चालक गंभीर जखमी

0
493

उमरगा:- तालुक्यातील लातुर- गुलबर्गा रोडवरील औराद पाटी जवळील पुलावरुन ट्रक नदीत पडुन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दि.5 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 च्या सुमारास घडली आहे.

 

सविस्तर वृत्त दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री ठीक 8:30 वाजता गुजरात कडून गुलबर्गाच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक GJ 36-8863 हा औराद पाटी जवळील पुलावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलात पडल्याने चालक भरजोड नानुभाई शंकरा, वय 36 रा. गुजरात हा गंभीर जखमी झाला असून, सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघात ग्रसताच्या मदतीला मोफत असलेली जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान नाणिज धाम ची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पीटल उमरगा येथे दाखल करण्यात आले असून, संबंधित ट्रक मध्ये 52000 हजार रुपये आढळून आले ते तेही तीथे जमा केले असल्याची माहिती रुग्ण वाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here