उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसलेंना उपअधीक्षकपदी बढती

0
532

 

 

 

उमरगा :–  येथील पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांची पदोन्नती होऊन त्यांची धाराशिव येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.अश्विनी भोसले आता आर्थिक गुन्हे शाखेत नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यांच्या पदोन्नतीनंतर, त्यांच्या जागी येणाऱ्या नवीन पोलिस निरीक्षकासमोर वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून जनतेचा विश्वास जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळवला

उमरगा पोलीस ठाण्याच्या  पोलीस निरीक्षक  अश्वीनी भोसले यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र शासनाच्या 100  दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा’ विशेष मोहिमेत उमरगा पोलिस ठाण्याने मराठवाड्यातून अव्वल स्थान पटकावले, ही उमरगा करीता अभिमानास्पद बाब होती. भोसले यांनी पोलिस ठाण्याच्या इमारतीचे सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि वृक्षारोपण करून ठाण्याचा कायापालट केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील सर्वांत सुंदर पोलिस ठाणे म्हणून उमरगा पोलिस ठाण्याची ओळख निर्माण झाली.हे अतुलनीय कार्य पोलिस निरीक्षक अश्वीनी भोसले यांच्या हातून घडले.हि ऐतिहासिक नोंद ठाण्याच्या कारकीर्दीत झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. भविष्यात त्यांच्या कारकीर्दीस आणखीन उजाळो मिळो अशा शुभेच्छा उमरगेकर यांच्या तर्फे.. शुभेच्छा..

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here