उमरगा :- भारतीय जनता पार्टी उमरगा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस ठाणे उमरगा येथे राखी पौर्णिमेच औचित्य साधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी उमरगा भाजपा ग्रामीणच्या वतीने समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना सण साजरे करता येत नाहीत . कुटुंब आणि नात्यापासून लांब असलेल्या पोलीस बांधवांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा तसेच समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाच, जिव्हाळयाच नात निर्माण व्हावे या उद्देशाने पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या जीवनात आजच्या दिवशी असलेल्या बहिणीच्या प्रेमाची जागा भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी उमरगा (ग्रा) महिला मोर्च्याच्या वतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस बांधवांना राख्या बांधन्यात आल्या यावेळी मा भाजपा जिल्हा सचिव सौ राणी राठोड, महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्ष सौ पूजा बालाजी माणिकवार, सौ संगीता कडगंचे, सौ बबिता पवार यांनी आपल्या सहकारी भगिनीना सोबत घेऊन राखीपौर्णिमेचा कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. तसेच नूतन पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच आम्रवृक्षाच रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस अधिकारी पिराजी तायवडे, रामहरी चाटे ,श्रीकांत भराटे, पांडुरंग कन्हेरे, पोलीस कर्मचारी विष्णू मुंडे, नवनाथ भोरे, यासीन सय्यद, सतीश पाटील इतर कर्मचारी बांधव यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, भाग्यश्री रणदिवे, स्वाती पवार, दीपा ख्याडे, भाग्यश्री पवार आकाशवाणी जाधव, त्रिशा गायकवाड, महेश कलशेट्टी, शरद पवार पिंटू राठोड, विकी राठोड, यशपाल कांबळे आदी उपस्थित होते .


