कोरेगाववाडी येथील काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा

0
37

 

उमरगा:- तालुक्यातील कोरेगाववाडी येथील  शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी,  येथे दि.12 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ. विजय बेडदुर्गे उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती.   यावेळी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल अमोल बिराजदार यांनी डॉ. एस. आर.रंगनाथन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. तसेच ग्रंथालयातील सेवा सुविधांविषयी माहिती दिली. प्राचार्य महेश कदारे यांनी विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकाबरोबर अवांतर वाचन करावे. त्यामुळे व्यक्तिमत्व विकास व सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होते असे यावेळी ते म्हणाले. तसेच राष्ट्रीय ग्रंथपाल दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.किरण पांचाळ, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.चनबस शेटगार, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here