उमरगा बस स्थानक येथे वाहनस्थळ व्यवस्था करण्याची कदेर ग्रामपंचायत ची मागणी

0
125

उमरगा:- शहरातील बस स्थानक येथे दुचाकी अथवा चार चाकी वाहन थांबवण्या करीता वाहनस्थळ नसून त्याची उमरगा आगाराच्या प्रशासनाने व्यवस्था करुन द्यावी अशी मागणी दि.14 ऑगस्ट रोजी आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदना मार्फत करण्यात आली आहे.

उमरगा आगार बसस्थानक येथे दुचाकी, चार चाकी वाहने थांबण्यासाठी  जागेची व्यवस्था  करुन देण्यात यावी, ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खाजगी कामासाठी दुचाकी, चारचाकी धारकांच्या येणा-यांची संख्या मोठ्याप्रमाणात असून, त्या शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी वाहन कोठे तर पार्क करुन जावे लागते. ज्या ठिकाणी वाहन पार्क केलेले असते ते ठिकाण पार्कींग चे नसल्या कारणास्तव, पोलीस विभाग, परिवहन विभाग यांच्याकडून खुप मोठ्याप्रमाणात दंड आकारला जातो. तो त्रास वाहन धारकांना होऊन नये त्याकरीता बसस्थानक येथे वाहनस्थळ सुरु करण्यात यावे. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग यांना त्यामाध्यमातून उत्पन्न निर्माण होण्यास मदत होईल यात शंका नाही. त्याकरीता उमरगा आगार व्यवस्थापक यांनी बसस्थानक येथे खाजगी भाडेतत्त्वावर चालणारे वाहनस्थळ सुरु करावे अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

निवेदनावर कदेर ग्रामपंचायत चे सरपंच सतीश जाधव,उपसरपंच राणी राठोड, दयानंद पांडुरंग जाधव,कदेर तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे,उपाध्यक्ष जाधव वैशाली, गोविंद भोसले,उमेश राठोड , हणमंत गायकवाड, डिंगबर जाधव, प्रभाकर औरादे,काशिनाथ कदम,राम राठोड आदीच्या सह्या आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here