कसगी येथील सिद्धेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याकडून शाळेतील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी — प्रेरणा शिष्यवृत्तीचे वाटप 

0
82

 

उमरगा  : – मनिष कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून इयत्ता दहावी 1998 बॅच कडुन दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा स्कॉलरशिपचे वाटप करण्यात आले.श्री. सिद्धेश्वर विद्यालय कसगी येथे 4 मे रोजी झालेल्या गेट टुगेदर च्या मनोगतात मनीष कुलकर्णी यांनी स्कॉलरशिपची संकल्पना मांडली होती त्याला अनुसरून 1998 दहावी बॅच तर्फे शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत शाळेने केवळ उत्तम शिक्षणच दिले नाही, तर आयुष्यात उपयुक्त ठरणाऱ्या मूल्यांची शिदोरी आणि सकारात्मक दृष्टिकोनही दिला ही ऋणनिर्देशाची भावना जपत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता आणि अभ्यासात सातत्य निर्माण करणे, आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून मदत करणे, गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचा सन्मान आणि प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे व उद्दिष्टपूर्तीची प्रेरणा देणे याकरिता दि.15 ऑगस्ट पासून सर्वानुमते शाळेतील हुशार होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप , शैक्षणिक साहित्य प्रमाणपत्र देण्यात आली. यात इयत्ता 7 वी साठी 9 हजार 8 वी साठी 12 हजार तर 9 वी साठी 9वी 15 हजार प्रति वर्षी शिष्यवृत्ती देन्यात येणार आहे.यांना स्कॉलरशिप देण्यात आली-
इयत्ता ७ वी – वेदांतिका चेनपटणे, मेघा कुंभार, वैभवी बदोले, इयत्ता आठवी – मेहराज जमादार, कीर्ती सुतार, साक्षी कुंभार, इयत्ता नववी- सादिया मुल्ला, मीनाक्षी जमादार, प्रियांका जमादार यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक आर. एम. माशाळे, सरपंच हणमंत गुरव शाळेच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पटणे सचिव विठ्ठलराव बदोले आदी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here