मुरूम :– शहरातील डॉ. झाकीर हुसैन उर्दू हायस्कूल मध्ये भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष रशीद शेख, संस्थेचे सचिव सलीम जमादार, संचालक मशाकसाब जमादार, प्राथमिकचे मुख्याध्यापिका श्रीमती जैनबबी कुरेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सय्यदा खुतेजा बेगम खतीब होत्या. प्रारंभी संचालक बंदगीसाब कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या दिनाच्या औचित्य साधून दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती खतीब यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्याला बोलायचे स्वातंत्र्य नव्हते शिकायचेही स्वातंत्र्य नव्हते. तेव्हा आपल्या वीर स्वतंत्र सैनिकांनी आपले सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्याचा लढा लढला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून अनेक गोष्टी घडल्या आहेत आपण शिक्षण विज्ञान कला खेळ क्षेत्रामध्ये पुढे गेलो ही प्रगती आपल्या स्वतंत्र सैनिकांच्या त्यागामुळेच शक्य झाली आहे असे सांगून आपल्याला आता हे स्वातंत्र्य टिकवायचे आणि देशाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्यामध्ये शिस्त मेहनत देशभक्ती आणि एकमेकाप्रति प्रेम हे गुण अंगीकारावे लागतील असे म्हणत आज आपण जो तिरंगा फडकवतोय, तो आपल्या देशाचा अस्मितेचा मान आहे म्हणून तो उंच राहिला पाहिजे प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले तर आपला भारत देश अधिक महान होईल असे ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नूर अहमद कानकुर्ती यांनी केले. सूत्रसंचालन जुबेर अत्तार आभार इम्तियाज जमादार यांनी मानले. यावेळी सहशिक्षक शहाजहा पटेल, शिपाई जोहरपाशा शेख, विजय कांबळे,महेबूब जमादार, राहील सय्यद गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Home आरोग्य व शिक्षण डॉ. झाकीर हुसैन उर्दू हायस्कूल मध्ये स्वतंत्र दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार


