उद्योजक फुलचंद जैन यांच्यातर्फे  नाईचाकूर येथील 22 मुलींना सायकली भेट

0
239

उमरगा :–  तालुक्यातील नाईचाकूर येथील जिल्हा परिषद प्रशाला  शाळेला  येथील रहिवासी सध्या छत्रपती संभाजी नगर येथील उद्योग व्यवसाय करण्यासाठी स्थायिक असलेले  रवी मसाले कंपनीचे मालक  फुलचंद  इंगलवार जैन यांनी आपली आई कै. सुमनबाई चंद्रकांत (इंगलवार) जैन यांच्या स्मरणार्थ  22 मुलींना सायकली भेट दिली आहे. नाईचाकूर गावालगत भगतवाडी, चिरेवाडी, कोळेवाडी या तीन वाड्यावस्त्यां आहेत. तेथील विद्यार्थी दररोज चार ते पाच किलोमीटर पायी चालत शाळेला येतात पावसाळ्यात भिजत उन्हाळ्यात ऊन लागत थंडीच्या दिवसात शाळेला  येतात फुलचंद इगलवार यांनी या विद्यार्थ्यांना पायी शाळेत न येता सायकलने शाळेत यावं म्हणून 22 मुलामुलींना सायकल भेट दिली आहे .श्री फुलचंद इंगलवार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईचाकूर येथे झाले ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांना 22 सायकली भेट दिले आहे जवळपास या सायकलची किंमत एक लाख रुपये आहे स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिना दिवशी श्री विजयकुमार नाभीराज जमालपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले फुलचंदजी इंगलवार यांची कर्मभूमी छत्रपती संभाजीनगर असली तरी त्यांची मातृभूमी नाई चाकूर नगरी आहे त्या नाई चाकूर नगरीतील ज्या शाळेत आपण शिकलो जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजेल त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रवेश घ्यावा म्हणून त्यांनी सायकल वाट दिली आहे खाजगी शाळेचे संस्थाचालक विद्यार्थ्यांना बसेस व इतर वाहनाची सोय करून शाळेला घेऊन जातात पण जिल्हा परिषद शाळेला तशी व्यवस्था होत नाही म्हणून फुलचंद इंगलवार यांनी दररोज पाच ते चार किलोमीटर पायी चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली आहे यावेळी प्रशालेची मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पवार भारतीय सैन्यातील माजी लेफ्टनंट कर्नल अरुण पवार, गोविंद अण्णा पवार ,रामभाऊ पवार ,गोविंदराव पवार ,लक्ष्मण पवार ,ज्ञानेश्वर पाटील, व्यंकट लादे ,संजय कांबळे पालक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here