कोरेगाववाडी येथील शिवाई शैक्षणिक संकुलात डाॅ.विजय बेडदुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
102

उमरगा :– तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, येथे भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ.विजय बेडदुर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे, डॉ.सुचेता पोफळे, डॉ.विजय गायकवाड, डॉ.सारिका बेडदुर्गे, नागनाथ कुंभार, विजय कुंभार ,धनंजय बेडदुर्गे, प्राचार्य महेश कदारे, डॉ. स्नेहल धर्माधिकारी, प्रा.अल्वीन काळे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नाट्य व भाषणे सादर केली. यावेळी डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा. अशोक गायकवाड, प्रा.श्रीकृष्ण मुळे, प्रा.अंकिता यादव, प्रा. धनश्री भुजंगे, प्रा. चनबास शेटगार, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी, प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. मंजुषा गव्हाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here