उमरगा:- तालुक्यातील तुरोरी येथील योध्दा सामाजिक संस्थेच्यावतीने दि.15 ऑगस्ट रोजी गावातील प्रत्येक अंगवाडीस एक याप्रमाणे नऊ अंगवाडीस नऊ ब्ल्युटुथ होम थेटर भेट म्हणून देण्यात आले. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे गावात कौतुक केले जात आहे. 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुरोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने माजी सैनिक डॉ. अण्णाराव शिंदे, मेजर बालाजी पवार,मेजर किरण शेळगे,माजी सैनिक संजय पवार यांचा सत्कार करण्यात आला तर अंगणवाडी सुसज्य व्हावी या करीता एक पाऊल म्हणुन योध्दा फाउंडेशन महाराष्ट्र च्या वतीने प्रत्येक अंगणवाडीस ब्ल्युटूथ होम थेटर भेट देण्यात आले.सरपंच मयुरी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.प्रति वर्षा प्रमाणे ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी, शिक्षक प्रभात फेरीने राष्ट्रगीत म्हणुन कर्यक्रमास शोभा आणली.तर माजी सरपंच माधव अण्णा जाधव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात अले. प्रसंगी माजी उपसरपंच पंडित शिंदे,माजी पं. स. सदस्य युवराज जाधव, महात्मा गांधी तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष पवन जाधव,योद्धा फाउंडेशनचे संस्थापक प्रदीप जाधव,ननुसाहेब पिरजादे,प्रताप तपसाळे,उप सरपंच तुकाराम जाधव, राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष जाधव,नेताजी सुर्यवंशी, राहुल कांबळे,भामाबाई तपसाळे,गोपिका जमादार आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामविस्तार अधिकारी एस.एस.कांबळे यांनी सूत्रसंचालन केले,कार्यक्रम यशस्वी करण्या करीता ग्रामपंचायत कर्मचारी पद्मानंद माने,घनश्याम भोसले, अर्जुन मोरे,रोहित साळुंके,राहुल कांबळे यांनी परिश्रम घेतले.


