कदेर गावात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव

0
201
  • उमरगा :- तालुक्यातील कदेर येथील प्रभाग तीन (3)चार (4)मधील दलित वस्तीतील गटारी व वीज लाईटचा व नाली/गटारीचा आणि पाण्याचा अभाव,परिसरात वाढलेले गवत.

प्रभाग फेरी प्रभाग तीन (3)चार (4)

 

प्रभाग तीन (3)चार (4) हा पूर्णपणे मागे पडलेला असून, इतर प्रभागांच्या तुलनेत येथे मूलभूत नागरी सुविधांचा मोठा अभाव आहे. वीज, रस्ते, नाली, पाणी यांसारख्या प्राथमिक गरजांच्या समस्यांनी येथील नागरिक हैराण आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे स्थानिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रभाग तीन ( 3)चार (4)मधील चा विस्तार हा लोकमान्य टिळक विद्यालय ते अंबाबाई मंदिरापर्यंत आहे.ते महादेव गल्ली पर्यंत आणि दलित वस्तीचा यात समावेश आहे.गावातील मेन रोड याच प्रभागात आहेत. त्यामुळे येथे दररोज ये जा करणाऱ्या शेतकरी,शाळेला जाणाऱ्या मुलांची रहदारी मोठीअसते; परंतु या सर्व भागांमध्ये अनेक सुविधांचा अभाव प्रथमदर्शनी जाणवतो. वाढलेले गवत, नालेसफाईचा अभाव, ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, बंद पडलेले पथदिवे या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. रमाई नगर,अण्णाभाऊ साठे नगर,भीमनगर येथे सिमेंट रस्ते झाले असले, तरी बहुतांश ठिकाणी नाल्या बांधण्यात आलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी आहेत, त्यांची नियमित सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे आणि सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.विशेषतः दलित वस्तीत अनेक वर्षांपासून कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. ग्रामपंचायतीने इतर भागांत काही प्रमाणात सुविधा पुरवल्या असल्या, तरी दलित वस्ती मात्र आजही सुविधांपासून वंचितच आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात शरद कांबळे यांच्या घरापासून मेन रोड कदेर पर्यंत व रमाई नगर येथे केवळ दीडशे मीटरचा सिमेंट रस्ता करण्यात आला त्यानंतर कोणतेही काम झाले नाही. आता तोही रस्ता अत्यंत खराब झाला आहे.गावातील सर्व रस्त्यावर व गटारीवर सर्व भागात अतिक्रमण या मुळे सांडपाणी रस्त्यावर येते.गटारीवर अतिक्रमण केल्यामुळे पाणी रस्त्यावर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे…एकहाती सत्ता असल्याने समस्या सुटतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मूलभूत सुविधा आजही कायम आहेत. परिसरात नियमित स्वच्छता न झाल्याने काटेरी झाडे व मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे नागरिकांना अत्यंत अस्वच्छ वातावरणात राहावे लागत आहे.

स्थानिकांचे म्हणणे काय…?

आमच्या भागात काहीच विकासकामे झालेली नाहीत. रस्ते, नाली. विजेचा प्रश्न कायम आहे. काही महिन्यांपासून येथील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे आम्हाला रात्रीच्या वेळी अडचर्णीना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने कायम आमची उपेक्षा केली आहे. -……

(श्याम चौधरी ),(सामाजिक कार्यकर्ते)

मारुती मंदिर परिसरात अस्वच्छता पसरली आहे. नाल्याची सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत असताना ग्रामपंचायतीचा स्वच्छता विभाग नेमका करतो तरी काय? स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

 

(मनोज पाटील) ,(ग्रामस्त.)

अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ते मुरूम रस्ता जाणारा रस्ता खड्डेमय असून, रात्री पूर्ण अंधार असतो. याच मार्गावरील गटारी साफ झाली नाहीत त्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अंधारात रस्त्यावरून ये-जा करावी लागते. गटारी साफसफाई होत नाही ते करण्याची मागणी अनेकवेळा ग्रामपंचायत कडे केली. मात्र, प्रत्येकवेळी ती दुर्लक्षित झाली, दलित वस्तीसाठी मंजूर निधीचा वापर नेमका कुठे होतो, याबाबत पारदर्शकता नसल्याने स्थानिकांत प्रचंड नाराजी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here