सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र शिबिरात १३८ रुग्णांची तपासणी

0
90

उमरगा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त बलसुर येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (ता.२०) रोजी श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ पुणे अंधजन मंडळ संचलित एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन वसंत साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. भाऊसाहेब बिराजदार को ऑपरेटीव्ह बँकेचे संचालक रामकृष्ण बिराजदार, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदिप पाटील , भारत शिक्षण संस्थेचे संचालक रमेश बिराजदार, सरपंच अश्विनी भोसले , प्राचार्य जयचंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती .  राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ पुणे आंदोलन मंडळ संचलित एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेतृत्व तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात बलसुर व परिसरातील गावातील 138 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली . यापैकी 28 रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया पुणे येथे मोफत करण्यात येणार आहे .मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार व सत्यनारायण जाधव यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले तर आभार सतीश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी. के. डी .कांबळे, विकास पाटील, विशाल पाटील, अब्दुल अत्तार, राजूदास चव्हाण, मधुकर सरवदे, रदयनाथ कवठे, निलेश सूर्यवंशी, सतीश कुंभार,आदींनी परिश्रम घेतले.    यावेळी बाळासाहेब बिराजदार, अमोल पाटील, , एम. डी. काळे, सत्यनारायण जाधव , व्यंकट बिराजदार ,संस्थेचे कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, संजय गव्हाणे, ब्रिजेश बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील, आयुब पटेल, गुरुलिंग वाकडे, ईश्वर साखरे, बाबुराव शिंदे, अशोक कुंभार, माधव विभुते, बळीराम नांगरे, के. टी. गायकवाड, महादेव पवार, चंद्रकांत भोसले, बंटी चिञे, वैभव बनसोडे, गणेश खुंटेगावे, अनिकेत चिवरे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here