भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे यश 

0
47

नळदुर्ग  :– लोहारा येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत यश शालेय बॅडमिंटन स्पर्धेत भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत संपादन केले आहे १७ वयोगटातील विद्यार्थासाठी हि स्पर्धा आयोजित केली होती त्या नुसार स्पर्धकानी स्पर्धेत उडी घेतली स्पर्धेत कु. समर्थ भिमाशंकर डोकडे, कु. हर्षवर्धन कैलास माणिकशेट्टी, कु. ऋग्वेद रंजीत सुतार या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या या यशाबद्दल भानुदासराव चव्हाण महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.सतीश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, प्रा. स्नेहलता करदुरे,‌ प्रा. विनोद तुंगे, क्रिडा मार्गदर्शक प्रा. मुंडे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here