उमरगा:- तालुक्यातील पेठ सांगवी गावाच्या ग्रामपंचायत स्थापनेपासून आतापर्यंत च्या इतिहासात कधीही असा सुवर्ण योग जुळून आला नव्हता व भविष्यात असा क्षण येईल का नाही माहीत नाही पण 2025 हे वर्ष आणि 26 ऑगस्ट 2025 हि तारीख पेठ सांगवीच्या इतिहासात आवर्जून आठवणीत राहील असा योग सर्वांच्या सहकार्यांने शक्य झाला आणि पहिल्यांदाच सरपंच, उपसरपंच हि दोन्ही पद मुस्लीम समाजाच्या नशिबी प्राप्त झाले.

2021 साली जी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक झाली तेंव्हा पेठ सांगवी सरपंच पद हे खुल्या प्रवर्गातील महिला करीता राखीव झाल होत आणि त्यापदावर नियमाने निवडून आलेल्या खुल्या प्रवर्गातील महीलांचा प्रथम अधिकार होता यात शंका नाही. पण संबंधित पदावर ओबीसी प्रवर्गातून निवडूण आलेल्या सुमन सुभेदार यांना सरपंच पद बहाल करण्यात आल. शासन नियमानुसार त्यांनी वेळेत ओबीसी जात प्रवर्गाच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्या कारणास्तव धाराशिव जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी काही महिण्यापुर्वी सुमन सुभेदार यांच सरपंच पद रद्द केल. त्या रिक्त जागेवर उपसरपंच सिराज शेख यांनी प्रभारी सरपंच म्हणून काही काळ ग्रामपंचायत चा कारभार हाकला. शासन नियमानुसार दि. 26 ऑगस्ट रोजी नविन सरपंच पदाची निवड करण्यात येणार असल्याचे पत्र आल्याने दि.26 ऑगस्ट रोजी निवडणूक अधिकारी जगदीश लांडगे यांच्या निगराणीत नविन निवड करण्यात आली.
दि.२६ ऑगस्ट रोजी सरपंच पदा साठी निवडणूक ठेवण्यात आली होती या वेळी १३ पैकी चार सदस्य जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अपात्र झाले तर बाकी ९ सदस्यांपैकी ७ सदस्य उपस्थित राहुन सुचक ग्रामपंचायत सदस्य संजय माळी यांनी ग्रामपंचायत सदस्य कौसरबी शब्बीर मुजावर यांचे नाव सुचवले व उपस्थित सदस्यानी मिळुन शासनाच्या वेळे प्रमाणे निवड अधिकारी जगदीश लांडगे यांच्या कडे सरपंच नामनिर्देशनपत्र सकाळी 10:20 वाजता दाखल केले. 12.00 पर्यंत एकच नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले कागदपत्र पडताळणी नंतर दुपारी 2 वाजता 9 पैकी 7 सदस्याच्या उपस्थितीत निवड अधिकारी जगदीश लांडगे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.पेठसांगवी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कौसरबी शब्बीर मुजावर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी तथा सरपंच निवड प्रक्रिया अधिकारी जगदीश लांडगे, तसेच तलाठी संजय कोकाटे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश मानतुटे यांच्या वतीने पुष्पहार व शाल फेटा नारळ देऊन सत्कार करण्यात .शासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला .
या वेळी उपसरपंच सिराज शेख,नुतन सरपंच कौसरबी शब्बीर मुजावर,ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, दत्तु राऊत, गिरमल दलाल, शितल कांबळे, प्रभावती शिंदे, ग्राम विकास अधिकारी गणेश मानतुटे, निवड अधिकारी जगदीश लांडगे,तलाठी संजय कोकाटे,लिपिक दिपक डिगोळे, सायबु किसवे, मार्तंड वाघे,गौतम सुरवसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एस. के. सुरवसे , शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अहेमद तांबोळी ,सास्तुर चौकीचे पोलिस अधिकारी धवन, आदी तसेच ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.


