उमरगा:- उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण परीसरात सततच्या पाऊसामुळे खरीप हंगामातील विविध पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले असून,मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दि.28 ऑगस्ट रोजी निवेदना मार्फत उमरगा- लोहारा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगेले यांनी केली आहे .
उमरगा, लोहारा तालुक्यात मागील दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु असून, विशेषतः लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मागील दोन दिवसात ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पाऊसामुळे सोयाबीन, उडीद, मुग, तूर आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानुसार जिल्हाभरात अनेक ठिकाणी पंचनामेही सुरु आहेत. परंतु उमरगा- लोहारा तालुक्यात ६५ मीमी पेक्षा कमी पाऊस पडल्याचे कारण दाखवून कुठल्याही प्रकारचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. मागील दोन दिवसात उमरगा, लोहारा तालुक्यात अतिवृष्टी व संततधार पाऊसामुळे खरीप पिके पाण्याखाली आली आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. उमरगा, लोहारा तालुक्यात पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याकरीता संबंधित विभागास आदेश निर्गमित करावेत.अशी मागणी निवेदना मार्फत उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे माजी तथा शिवसेना उप नेते आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे.
Home ताज्या बातम्या शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...


