सेवा नगर तांडा कदेर येथील अवैद्य दारू विक्री बंद करण्याची तंटामुक्त समितीची मागणी 

0
110

उमरगा:–  तालुक्यातील सेवा नगर तांडा कदेर येथे खुलेआम राजरोसपणे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून संबंधित दारू विक्री तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी कदेरच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती व ग्रामस्थांच्या वतीने उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दि. 01 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.  कदेर गावापासून जवळच असलेल्या सेवा नगर तांडा येथे हातभट्टी ,गावठी, कॉटर्सची खुलेआम दारू विक्री सुरू असून, जेव्हा पण पोलीस विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येते. त्यानंतर काही दिवस दारू विक्री बंद ठेवण्यात येते व त्यानंतर परत अवैध दारू विक्री सुरू करण्यात येत असून, ती कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी विनंती उमरगा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली आहे. निवेदनावर कदेर च्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव साखरे तसेच गावकऱ्यांच्या सह्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here